'टक्कल व्हायरस नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका' : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    10-Jan-2025
Total Views |
Buldhana Takkal

बुलढाणा : बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, काठोरा, कालवड या गावांमध्ये केवळ तीन दिवसांतच नागरिकांना टक्कल ( Buldhana Takkal ) पडत असल्याचा प्रकार समोर आला होता. याचे कारण आता समोर आले आहे. केस गळती होत असलेल्या बाधीत गावांतील पाणी पिण्यास, वापरण्यास अयोग्य असल्यामुळे हा प्रकार घडून आला.

नागरिकांना अचानक डोक्यात खाज येणे, केस गळणे व टक्कल पडणे असा प्रकार घडून आला. यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक टक्कल पडल्याने लोक घाबरले आहेत. यामध्ये जवळजवळ ७० ते ८० लोकांचे आतापर्यंत टक्कल पडले. या गावांमध्ये आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सर्वेक्षण केले. गावकऱ्यांना शुद्ध पाणी वापरण्यास सांगितले गेले. हा कसल्याही प्रकारचा व्हायरस नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.