केजरीवालांना भोवलं 'ते' वादग्रस्त विधान, जेपी नड्डा यांनी सुनावले खडे बोल!

    10-Jan-2025
Total Views |

kjp
नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये व्होटींगचा फ्रॉड होणार असून, उत्तर प्रदेश आणि बिहार मधून मतदार आयात केले जात असल्याचे खळबळजनक विधान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या याच विधानाचे समाजमाध्यमांवर आता गंभीर पडसाद उमटले असून अनेकांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते जे पी नड्डा यांनी सुद्धा केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहे.
 
केजरीवाल यांच्या वादग्रस्त विधानाचे व्हिडीओ शेअर करत नड्डा म्हणाले की पराभवाच्या भीतीमुळे केजरीवाल आज अश्या प्रकराची विधानं करीत आहेत. मागची १० वर्ष दिल्लीची लूट केल्यानंतर, केजरीवालांनी आता राजकारणासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य करायचे ठरवले आहे. त्यांना व त्यांच्या पक्षाला सत्तेतून हाकलून लावत जनता उत्तर देईल हे नक्की. त्याच बरोबर अमित मालविय यांनी सुद्धा केजरीवाल यांना धारेवर धरलं त्यांच्या वादग्रस्त टिपण्णी वर बोलताना ते म्हणाले की " अरविंद केजरीवाल यांना बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक परके वाटतात. परंतु बांगलादेश मधून येणारे रोहिंग्या घुसखोर मात्र आपले नातेवाईक वाटतात. अशी 'आप'दा आता आपल्याला नको"