मुंबई : स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत हेल्पिंग हँड फाऊंडेशनतर्फे (Helping Hand Foundation -NGO) मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे व आसपासच्या विभागातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी एका विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजूषा स्पर्धा असून त्यात युवा दिनाबाबत ३० प्रश्न विचारले जातील. सोबत दिलेल्या पर्यायापैकी (MCQ) एक पर्याय निवडायचा आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकास राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रथम पाच स्पर्धकांना विशेष पारितोषिकाने गौरविले जाईल. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या गूगल फॉर्मची लिंक वर क्लिक करून आपली माहिती दिनांक १२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.३० वाजण्यापूर्वी पर्यंत नोंदविणे बंधनकारक आहे.
- नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा!