"कठोर परिश्रम करा, निस्वार्थी रहा आणि जाणूनबुजून चुका करू नका", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निखिल कामथ यांना सल्ला

    10-Jan-2025
Total Views |

Narendra Modi podcast
 
नवी दिल्ली : झेरोधा या कंपनीचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी दि : १० जानेवारी २०२५ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांना निखिल कामथ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘कठोर परिश्रम करा, निस्वार्थी व्हा आणि जाणूनबुजून चुका करू नका’, असा जीवनावश्यक मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
 
मोदी म्हणाले की, आपल्या जीवनमध्ये आपण कठोर परिश्रम करावे, निस्वार्थी राहू नका आणि कोणत्याही वाईट हेतूने चुका न करण्यासाठी आपले योगदान समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो होतो तेव्हा म्हणालो होतो की, मी कठोर परिश्रम करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मी निस्वार्थी राहणार नाही आणि वाईट हेतूने चुका करणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी निखिल कामथ यांच्याशी संवाद साधत असताना सल्ला दिला आहे.
 
मोदी यांनी निखिल कामथ यांच्या युट्यूब संभाषणाच्या पॉडकास्टमध्ये पदार्पण केले आहे. यानिमित्ताने कामथ यांनी सोशल मीडियावर नरेंद्र मोदींचा पहिल्या पॉडकास्टचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला होता.