पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास रुग्णाला नकार, काँग्रेसच्या कर्नाटकात लज्जास्पद प्रकार
10-Jan-2025
Total Views |
बंगळुरू : कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधील एका रुग्णाला रुग्णालयामध्ये सरकारी योजनेचा (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) लाभ दिला नसल्याची लाजीरवानी घटना घडली आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा रुग्णाला लाभ देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेने स्वत: कर्नाटक सरकारकडे याप्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
मिळालेल्या अवहवासानुसार, ही घटना किडवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी येथे घडली आहे. संबंधित रुग्णालय हे कर्करोगाचे निदन करणारे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सरकारी योजनेपासून रुग्णाला वंचित ठेवण्यात आले आहे. ५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यासाठी नकार दिला. याला मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर प्रकरण असल्याचे बोलले गेले आहे. जेष्ठ नागरिकांना त्यांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळत नसेल तर रुग्णावर अन्याय झाल्यासारखेच आहे.
आयोगाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि कर्नाटक सरकारला या योजनेची अंमलबजावणी राज्य आणि इतर केंद्रशासित प्रदेशामध्ये कशी सुरू आहे याची विचारणा करण्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनाचे उद्दिष्ट गरीब आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपचारासाठी ५ लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकार करते. मात्र कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्याने काही रुग्णालयांमध्ये केंद्र सरकारची आरोग्यासंबंधित असलेल्या योजनेचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याचे बंगळुरूमधील घटना आहे.