अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी धोक्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये अनेक कलाकारांची घरं असून मोठ्या संख्येने ती जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले असून तेथे आणीबाणी जाहिर करण्यात आली आहेलॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून १७ जानेवारी २०२५ रोजी होणारा नामांकनाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बेटर मॅन’ आणि ‘द लास्ट शोगर्ल’ चे प्रीमियर देखील रद्द करण्यात आले आहेत. ऑस्कर नामांकने देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली असून ऑस्कर २०२५ च्या नामांकनांची घोषणा देखील १७ जानेवारी ऐवजी १९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली आहे. या आगीत आत्तापर्यंत ५७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून लोकांनी जीव देखील गमावले आहेत.