श्रीराज नायर यांच्या हस्ते कांचन तोडी यांच्या एकल प्रदर्शनाचे उद्घाटन

    10-Jan-2025
Total Views |

Kanchan Todi
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kanchan Todi Art exhibition) स्वारंग आर्ट इनिशिएटिव्हच्या माध्यमातून प्रसिद्ध कलाकार कांचन तोडी यांचे एकल प्रदर्शन "कॉस्मिक इंप्रिंट्स: अ कॅनव्हास ऑफ स्पिरिच्युअल रिफ्लेक्शन्स"चा उद्घाटन सोहळा मुंबईत संपन्न झाला. दि. १० ते १२ जानेवारी दरम्यान द बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे सदर प्रदर्शन भरत आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वा. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल, प्रसिद्ध गायिका अपर्णा मयेकर, अष्टपैलू अभिनेत्री इरावती हर्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन वर्षा कराळे यांनी क्युरेट केले असून स्वरंग आर्ट इनिशिएटिव्हने सादर केले आहे. १० ते १२ जानेवारी दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० या कालावधीत प्रदर्शन पाहता येईल.