मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित ‘इतिहास कट्टा, पर्व दुसरे : गोष्ट 'ती'ची’ या कार्यक्रमाअंतर्गत रविवार १९ रोजी ‘बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे वनविहार उद्यान, ऑफ देवीदास रोड(प्रजापिता ब्रह्मा कुमारी गार्डन जवळ/ओम शांती चौका जवळ) बोरीवली पश्चिम मुंबई ४०००९२’ येथे संध्याकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध ज्येष्ठ पुरातत्वज्ञ, विद्वान संशोधक व भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.अरविंद जामखेडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘अथर्ववेदातील माता भूमि: ते भारतमाता या संकल्पनेचा प्रवास’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. जनसेवा केंद्र बोरीवली हे इतिहास कट्टा या उपक्रमाचे प्रायोजक आहेत, तर व्हिजनरी स्टुडिओज, मीरा रोड हे समाजमाध्यम सहयोगी आहेत. अधिकाधिक इतिहासप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.