माध्यमतज्ञ, रंगकर्मी आणि लेखक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचे निधन

    10-Jan-2025
Total Views |

mehendale
 
ठाणे : ज्येष्ठ माध्यमतज्ञ, संपादक,रंगकर्मी आणि लेखक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचे गुरुवार ९ जानेवारी रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी मुलुंड येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
 
डॉ. विश्वास मेहेंदळे दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, नंतर वृत्तसंपादक होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे माजी प्रमुख , ईएमआरसीचे संचालक, सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे ते संचालक होते. त्यांची १८ हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहे. आठ एकपात्री प्रयोगांचे शेकडो प्रयोग केले. पुण्याच्या पीडीए नाट्यसंस्थेच्या अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला. व्यावसायिक रंगभूमीवरही 7 नाटकांचे एक हजारांहून अधिक प्रयोग अभिनय केला. मुंबई दूरदर्शन वर "वाद संवाद" या कार्यक्रमाचे त्यांचे सूत्रसंचालन खूप गाजले.