भंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची शुक्रवार, १० जानेवारी रोजी सांत्वनपर भेट घेतली.
नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे २९ डिसेंबर रोजी निधन झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत मीराबाई पटोले यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.