महाकुंभमेळ्यात अदानी समूह आणि इस्कॉनचा महाप्रसाद दान करण्यास हातभार

    10-Jan-2025
Total Views |
 
Mahakumbh Mela
 
नवी दिल्ली : अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी हे पुढील आठवड्यात प्रयागराजमधील होणाऱ्या महाकुंभमेळ्यामध्ये महाप्रसादासाठी हातभार लावता येणार आहे. त्यांच्यासोबतच इस्कॉनही महाप्रसादासाठी मदत करणार आहे. दोन्ही संस्था १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाकुंभमेळ्यामध्ये संपूर्ण कालावधीत भाविकांना महाप्रसादाची सेवा देणार आहेत.
 
याप्रकरणी आता गौतम अदानी यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले की हे माझे भाग्य आहे ती, महाकुंभमेळ्यामध्ये इस्कॉनच्या मदतीने आम्ही भाविकांना महाप्रसाद सेवा सुरू करत आहोत, ज्यात अन्नापूर्ण मातेच्या आशीर्वादाने लाखो लोकांना मोफत जेवण दिले जाईल. अदानी यांनी गुरूवारी या उपक्रमामध्ये इस्कॉन गव्हर्निंग बॉडी कमिशन चे अध्यक्ष गुरु प्रसाद स्वामी यांची भेट घेतली होती.
 
 
 
पुढे त्यांनी इस्कॉनच्या सहकार्याने होणाऱ्या महाप्रसादाच्या सेवेबद्दल बोलत असताना म्हणाले की, आई अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने लाखो भाविकांना मोफत महाप्रसादाचा लाभ देण्याचे भाग्य वाट्याला आले. खऱ्या अर्थाने ही सेवा देशभक्तीचे सर्वोच्च स्वरूप आहे. सेवा म्हणजे ध्यान, सेवा म्हणजे प्रार्थना आणि सेवा म्हणजे देव, अशी पोस्ट त्यांनी केली होती.
 
कुंभमेळ्यामध्ये महाप्रसादाची सेवा ही एकूण ५० लाख भाविकांना दिली जाणार आहे. कुंभ मेळ्याच्या परिसरामध्ये बाहेरील दोन स्वयंपाकघरामध्ये महाप्रसाद तयार केला जाईल. महाकुंभ परिसरातील ४० ठिकाणी अन्न वाटप केले जाईल आणि या उपक्रमामध्ये १,२०० स्वयंसेवक सहभागी होतील.