अॅप्पल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी महाकुंभमेळ्यात होणार सहभागी
10-Jan-2025
Total Views |
लखनऊ : महाकुंभ मेळावा (Mahakumbh Mela) हा १२ वर्षानंतर भारतात भरत असतो. हिंदू धर्माच्या या मेळाव्यासाठी अनेक काळापासून सुरू असलेल्या परंपरेत मनुष्य हा एकमेकांशी जोडला गेला जातो. यंदाच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळावा भरणार आहे. महाकुंभ मेळावा २०२५ मध्ये जगातील अनेक श्रद्धाळु आपली उपस्थिती दर्शवतात. अशातच आता अॅप्पल कंपनीचे सह संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेलही दि: १३ जानेवारी २०२५ रोजी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. एका मासिकाने याप्रकरणाची माहिती दिली आहे.
महाकुंभ मेळाव्यामध्ये लॉरेन पॉवेल जॉब्स या आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यांच्या निवासासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. महाराजा डिलेक्स कॉटेजमध्ये वास्तव्यास असणार आहेत. निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशनंद यांच्या शिबिरामध्ये २९ जानेवारीपर्यंत सहभागी असणार आहेत. सनातन धर्म समजून घेण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. शिवाय १९ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यातील कथेच्या त्या पहिल्या सन्माननीय पाहुण्या असतील अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, स्टीव्ह जॉब्सचाही सनातन धर्मावर विश्वास होता. त्यांनी याबद्दल अनेक किस्से सांगितले आहेत. तसेच त्यांना भारतीय साधू संतांवर विश्वास आहे. त्यापैकी निम करोली बाबा हे एक होते. १९७४ साली स्टीव्ह जॉब्स हे निम करोली बाबाच्या दर्शनासाठी भारतात आले होते.