‘कै. अनिल साठ्ये स्मृती काव्यपुरस्कारासाठी’ काव्यसंग्रह/गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन

    10-Jan-2025
Total Views |


image

 

डोंबिवली : काव्यरसिक मंडळ, डोंबिवली तर्फे ‘कै. अनिल साठ्ये स्मृती काव्यपुरस्कारासाठी’ कवींना व गझलकार काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी ‘काव्य-उन्मेष पुरस्कार २०२४’ (रुपये २०००/- आणि स्मृतीचिन्ह), ‘सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह २०२४’ (रुपये २५००/- आणि स्मृतिचिन्ह) आणि ‘सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह २०२४ (रुपये २५००/- आणि स्मृतिचिन्ह) असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या संग्रहाच्या दोन प्रती ‘हेमंत राजाराम, ब्लॉक नं.- ४, दुसरा मजला, अश्विनी निवास, महात्मा फुले मार्ग, डोंबिवली (पश्चिम), पिनकोड- ४२१२०२’ या पत्त्यावर पार पाठवायच्या आहेत. पुरस्कार वितरण ९ मार्च २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या मंडळाच्या ५९ व्या वार्षिक संमेलन सोहळ्यात करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ८१६९७१९३८९, ९३२०२०३२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.