भाजप आणि मुलुंड सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कोकण महोत्सव २०२४-२५'

10 Jan 2025 20:58:27

Konkan Mahotsav 2024-25
 
मुंबई : भाजपा आणि मुलुंड सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कोकण महोत्सव २०२४-२५" या भव्य सांस्कृतिक सोहळ्याला दि : ९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी भाजपा मुंबई अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री, आदरणीय ऍड. आशिष शेलार साहेब, विधान परिषद गटनेते, आमदार प्रवीण दरेकर जी आणि आमदार मिहीर कोटेचा जी यांनी उपस्थिती दर्शवली.
महाराष्ट्राचे मंत्री झाल्यानंतर प्रथमच मुलुंडमध्ये आलेल्या आदरणीय आशिष शेलार साहेबांनी महोत्सवातील सांस्कृतिक व पारंपरिक प्रदर्शनाचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये नवी ऊर्जा संचारली.
"कोकण महोत्सव २०२४-२५" अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी आपला प्रतिसाद आणि सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि त्याला यशस्वी बनवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री दीपक दळवी आणि मुंबई हाउसिंग फेडरेशन अध्यक्ष श्री प्रकाश दरेकर, मा.नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0