परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी घेतली सौदी अरेबियाच्या मंत्र्यांची भेट

    09-Sep-2024
Total Views |
foreign minister s jaishankar visited saudi arabia
 
 
नवी दिल्ली :       परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सौदी अरेबिया आणि कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रियाध येथे इतर जीसीसी सदस्य देशांच्या असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेण्याची शक्यता आहे. यात जीसीसी सदस्य देशांत संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवेत यांचा समावेश आहे.
 
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद यांची भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय संबंधातील प्रगतीबाबत चर्चा केली असून जयशंकर यांनी 'एक्स'वर एका पोस्ट केली आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांची रियाधमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर मते मांडली आहेत, असे एस जयशंकर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जयशंकर यांच्या भेटीपूर्वी सांगितले होते की, भारत आणि जीसीसी यांच्यात खोल आणि बहुआयामी संबंध आहेत. ज्यात व्यापार आणि गुंतवणूक आणि ऊर्जा, सांस्कृतिक आणि परस्परव संबंध यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात येथे पोहोचले आहेत. परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्यात जर्मनी आणि स्वित्झर्लंडलाही भेट देणार आहेत.