सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी : चंद्रशेखर बावनकुळे

    09-Sep-2024
Total Views |
bjp state president chandrashekhar bawankule


महाराष्ट्र :      नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये व दोषींवर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.




ते म्हणाले, अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटिव्ही फुटेज तपासावेत,कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.