श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळात २१०० विद्यार्थिनींचे अथर्वशीर्ष पठण
09-Sep-2024
Total Views |
मुंबई : पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना प्रसिध्द गायक कैलाश खैर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळात सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील २१०० विद्यार्थिनींनी एकत्रित येत सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले आहे. या आधी पुण्यातील मानाचा गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले होते.
हे वाचलंत का? - महाMTB घरगुती ईकोफ्रेंडली गणेशा 2024: जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे!
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे यंदाचे १३३वे वर्ष असून पार्श्वगायक कैलाश खैर यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी म्हटले की, गायक कैलाश खैर यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली याचा मला आनंद आहे. या उत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही पुनीत बालन यांनी सांगितले.
हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची सर्वदूर ख्याती आहे. पुण्यात भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा १३३वे वर्ष असून गायक कैलाश खेर च्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली आहे. या बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस 'श्रीखंडी' या पहिल्या ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथकाचे वादन झाले आहे. दरम्यान कैलाश खेर यांनी एखाद्या तीर्थक्षेत्र स्थळी आल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले आहे.