थकबाकी न भरल्यास बत्ती गुल; अदानी ग्रुपचा युनूस सरकारला इशारा

    09-Sep-2024
Total Views |
adani-group-warns-bangladesh-that-serious-situation

 
नवी दिल्ली :      देशातील मोठा उद्योग समूह अदानी ग्रुपने बांगलादेशच्या अंतरिम सरकारला वीज प्रकल्पाला इशारा दिला आहे. बांगलादेशमधील राजकीय स्थित्यंतरानंतर नव्याने स्थापित झालेले युनुस सरकारला वादग्रस्त उर्जा प्रकल्पाची थकबाकी भरल्यास मोठे आर्थिक संकटास सामोरे जावे लागेल, असा इशारा अदानी समूहाने दिला आहे.




दरम्यान, अदानी समूहाने नोबेल शांतता पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला वादग्रस्त ऊर्जा प्रकल्पाची थकबाकी भरल्यास गंभीर आर्थिक संकट ओढवू शकते असा इशारा दिला आहे. वास्तविक, बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांची विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यानंतर मुहम्मद युनूस यांचे सरकार आले. द फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालानुसार, बांगलादेशकडे ५०० दशलक्ष डॉलर्सची थकबाकी असून सुरुवातीच्या काळात युनूस सरकारसाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, अदानी समूहाने बांगलादेशला चेतावणी दिली की, ५०० दशलक्ष डॉलर वीज देय न भरल्यास वीज बिघाड होऊ शकतो.

युनूसचे सरकार देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये जागतिक बँकेकडून कर्ज मिळविण्याच्या योजनांचाही समावेश आहे. अलीकडेच, भारत सरकारने वीज निर्यातदारांना देशांतर्गत बाजारपेठेत वीज विकण्याची परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली.