चालत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर कट्टरपंथींकडून लैंगिक शोषण
09-Sep-2024
Total Views |
लखनऊ : एका १७ वर्षीय अल्पवयीन अनुसूचित जाती जमातीतील मुलीवर चारचाकी वाहनात लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना उत्तर प्रदेशातील गोंढा येथील आहे. याप्रकरणात मारहाणी दरम्यान वाहन विजेवर धडकल्याने आरोपींनी तिथून पळ काढला होता. संबंधित पोलीस अधिकारी मनोज कुमार पाठक यांनी सांगितले की, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणात पीडितेच्या आईने तक्रारीत लिहिले की, तिच्या मुलीला मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद रिझवान नावाच्या कट्टरपंथींनी आमिष दाखवून तिला त्यांच्या कारमध्ये घेतले. तक्रारीनुसार, त्यांनी मुलीला सर्कुलर रोड येथील निर्जन भागात नेले आणि चालत्या गाडीत तिच्यावर शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यावर आता पोलिसांनी पुष्टी केल्यानंतर समजले की, आरोपींचे नियंत्रण सुटले आणि नंतर ते विजेच्या खांबाला धडकले, अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, आरोपींनी चार चाकी वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढायला सुरूवात केली.
यावेळी पीडितेने तिच्या घरी पोहोचताच घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर तिच्या आईने रविवारी पोलिसांत तक्रार केली. पोलीस पाठक म्हणाले की, आरोपींविरोधात आता एफआऱआय दाखल करण्यात आली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पाठवण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.
याप्रकरणात पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त केल्याने यावर आरोपीपैकी असलेल्या आरिफने दावा केला की, त्याने नातेवाईकांच्या अंत्यविधिला उपस्थित राहण्याच्या बहाण्याने मित्रांकडून कार घेतली होती. याप्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.