जो कायदे में रहेंगे वही फायदे में रहेंगे!

गणेशमंडळावरील दगडफेक प्रकरणी गुजरात पोलिसांची मोठी कारवाई

    09-Sep-2024
Total Views |

Surat Stone Pelting

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Surat Stone Pelting) 
सूरतच्या लालगेट परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळावर काही अल्पवयीन कट्टरपंथींनी दगडफेक केल्याची घटना निदर्शनास आली आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी धडक कारवाई करत सर्व आरोपींना पकडले आहे. 'जो कायदे में रहेंगे वही फयदे में रहेंगे!', या ब्रीदवाक्याने गुजरात पोलीस काम करत असल्याचे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

हे वाचलंत का? : या बसलेल्या बायकांची डोकी थाऱ्यावर नाहीत काय?

हर्ष संघवी म्हणाले की, "सुरतच्या पोलिसांनी एकही आरोपी सोडला जाणार नाही, याची काळजी घेतली होती. त्याचवेळी, एकाही निरपराध व्यक्तीला अटक होणार नाही याचीदेखील काळजी घेतली होती. यासाठी सुरत पोलिसांनी सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी आणि ड्रोन व्हिज्युअल सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजकंटकांना पकडले आहे."


सूरतच्या लालगेट परिसरात गणेश चतुर्थीच्या दिवशी वरियाली मोर्केटजवळ सदर घटना घडली. यावेळी पोलिसांनी प्रकरण हाताळले असता पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली व सर्व आरोपींविरोधात धडक कारवाई करत सूर्योदयापूर्वीच ताब्यात घेतला आहे.