शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हा ढोंगीपणा!

प्रविण दरेकरांची खोचक टीका

    09-Sep-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
मुंबई : शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा आहे, अशी खोचक टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांचा हा ढोंगीपणा समजत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी शनिवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावरून दरेकरांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
 
 
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "४० वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते. आता ३० वर्षांनंतर पुन्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेत. त्यामुळे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर का होईना, रायगडाची आणि लालबागच्या राजाची आठवण त्यांना आली आहे. लालबागच्या राजाला मी प्रार्थना करतो की, शरद पवारांना हिंदूत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देवो."
 
हे वाचलंत का? -  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाचरणी नतमस्तक!
 
"परंतू, ज्ञानेश्वर महाराव यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्रांचा, विठूरायाचा आणि हिंदूत्वाचा अपमान केला. पण त्यावर काहीही न बोलता दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं हे ढोंग आहे. परंतू, महाराष्ट्रातील जनतेला त्यांचं हे ढोंगी प्रेम आणि श्रद्धा समजून येतं," असे ते म्हणाले.