१० वर्षात २५ टक्के कट्टरपंथींच्या लोकसंख्येत वाढ

    09-Sep-2024
Total Views |
 
Muslim population Growth
 
शिमला : हिंदूंहून अधिक हिमाचल प्रदेशातील शिमला येथे कट्टरपंथींच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच याचसोबत दिवसेंदिवस बेकायदेशीर वाढत्या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी होत आहेत. यामुळे हिमाचल प्रदेशातील मशिदी आणि मदरशांच्या संख्येतही वाढ झाली. अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधलेले बांधकाम असून यामध्ये राज्य वक्फ बोर्डाचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. गेल्या ३-४ वर्षांमध्ये राज्यातील लोकसंख्या बदलण्याचे प्रयत्न वाढले असल्याचे बोलले जात आहे. लोकसंख्येप्रमाणे मशीदींच्या संख्येतही हिमाचल प्रदेशात वाढ झाली आहे.
 
शिमला येथे बेकायदेशीर बांधलेली संजौली मशीद पाडण्याची मागणी सध्या जोर धरून आहे. याविरोधात आता हिमाचल प्रदेशातील हिंदू रस्त्यावर उतरले असून राज्यात उभारल्या जाणाऱ्या अतिक्रमण केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. तसेच येथील स्थानिक लोकसंख्येत वाढ झाल्याने घुसखोरी होत असल्याचा अंदाज स्थानिकांनाही आहे.याठिकाणी अवैध घुसखोरी असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
 
लोकसंख्या वाढीमुळे मशीद आणि मदरशांच्या लोकसंख्येत वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम झाली. अशाचप्रकारे हिमाचल प्रदेशही हा एक हिंदूबहुसंख्य असलेले राज्य आहे. येथील ९० टक्के लोकसंख्या हिंदू धार्मिक अनुयायी आहेत. मात्र असे असताना हिंदू धर्माच्या लोकसंख्येच्या वाढीहून कट्टरपंथींच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे.
 
२००१ ते २०११ वर्षाच्या लोकसंख्येत वाढ
 
हिमाचल प्रदेशात जनगणनेनुसार पाहिल्यास २००१ ते २०११ वर्षादरम्यान, राज्यातील कट्टरपंथी लोकसंख्या २५ टक्के दराने वाढली आहे. हिमाचल प्रदेशातील कट्टररपंथींची २००१ या वर्षात १.९१ लाख होती. २०११ या वर्षात त्यात वाढ होऊन ती लोकसंख्या १. ४९ लाख झाली. या कालावधीत त्यात २५. ६ टक्के वाढ झाली. या काळात हिंदू लोकसंख्येच्य़ा वाढीचा दर हा केवळ १२ टक्के होता. मात्र कट्टरपंथींच्या लोकसंख्येत दुप्पट वाढ झाली होती.
 
 
 
मशिदींच्या संख्येत वाढ
 
लोकसंख्येसह हिमाचल प्रदेशात मशीदींच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. .याआधी कोरोनाकाळापर्यंत ३९३ मशिदी होत्या. मात्र कोरानाकाळानंतर आतापर्यंत यामध्ये वाढ झाली आहे. कोरोनानंतर मशीदींची संख्या ही ५२० झाली. सिरमौर जिल्ह्यात सर्वाधिक १३० मशीदी बांधण्यात आल्याचे सांगितले गेले. याशिवाय हिमाचल प्रदेशातील चंबा येथे ८७ आणि उनामध्ये ५२ मशीदी बांधण्यात आल्याचे सांगितले गेले. याशिवाय हिमाचल येथे मदरशाच्या संख्या ३५ वर गेली आहे.