वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय!

    09-Sep-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात १९% घसघशीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या कामगारांचे वेतन इतर राज्यातील कामगारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या निर्णयामुळे वीज कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
हे वाचलंत का? -  दोन हाणा पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणा! चित्रा वाघ यांची ठाकरेंवर खोचक टीका
 
शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे हित लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मार्च २०२४ पासून तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात १९% घसघशीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कामगारांचे वेतन इतर राज्यातील कामगारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यासोबतच महानिर्मिती कंत्राटी कामगारांच्या इतर अनेक मागण्यांची दखल घेत सरकारने त्यादेखील मागण्या मान्य केल्या आहेत.