कट्टरपंथी काँग्रेस समर्थकाचे घृणास्पद कृत्य! आधी गाडीत बसवून केले अपहरण, नंतर पाच दिवस केले शारीरिक शोषण

    09-Sep-2024
Total Views |
 
minor Girl sexual Assault
 
लखनऊ : पीडितेला शिकवणीच्या तासाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप दोन कट्टरपंथींवर आहे. साजिद पाशा आणि मुदस्सीर असे बलात्कार करणाऱ्या कट्टरपंथींचे नाव असून ही घटना शुक्रवारी ३१ ऑगस्ट रोजी घडली. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील ही घटना असून याप्रकरणामुळे साजिद पाशा आणि मुदस्सीरला अटक करण्यात आली. साजिद हा काँग्रेसचा समर्थक असल्याची माहिती सांगण्यात आली.
 
रामपूर जिल्ह्यातील एका रूग्णालयाचे मालक साजिद पाशा आणि मुदस्सीर यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. यांनी एक हिंदू पीडितेला शिकवणीला सोडतो असे सांगून आपल्या चारचाकी वाहनात बसवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तिचे अपहरण केल्याचा आरोपही कट्टरपंथींवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुदस्सीरला अटक केली आहे. तर फरार असलेल्या साजिदवर २५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
 
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना रामपूरच्या पोलीस ठाणे परिसरात घडली. साजिद पाशा ग्रीन सिटी नावाच्या रूग्णालयाचा संस्थापक आहे. साजिदवर ३१ ऑगस्ट रोजी शिकवणीला सोडतो असा बहाणा बनवून ११ वीच्या विद्यार्थ्यीनीला आपल्या विश्वासात घेतले आणि गाडीत बसवले. त्यावेळी जवळपास कोणीही नसल्याची आरोपींनी पाहिले असता पीडितेचे अपहरण केले.
 
त्यानंतर आरोपी हा पीडितेला उत्तराखंड येथे रामनगर येथील रिसॉर्टमध्ये गेला होता. येथे पीडितेला बंद खोलीत ठेऊन तिच्यावर तीन दिवस, अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा त्याच पीडितेला रूद्रपूर येथे नेऊन तिचे पुन्हा शारीरिक शोषण केले. यावेळी आरोपीने पीडितेला शस्त्रे दाखवून धमकी दिली होती.
 
 
 
पीडितेवर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडितेला साथीदार मुदस्सीरकडे सोपवले गेले. त्यानंतर मुदस्सीरने पीडितेला बरेलीला घेऊन जात होता. यावेळी पीडितेच्या वडिलांनी पीडितेचा मोबाईल ट्रॅक केला. त्यावेळी पीडितेच्या लोकेशनचा पाठवलाग करत पोलिसांनी पीडितेचा जीव वाचवून मुदस्सीरला तब्यात घेतले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, साजिद हा दोन पत्नींचा नवरा आहे. पीडितेच्या वडिलांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे फरार असलेल्या साजिद पाशाविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच साजिद हा स्वत:ला काँग्रेसचा समर्थक असून असे कृत्य करण्यासाठी त्याला २५ हजार रूपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.