दोन हाणा पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणा! चित्रा वाघ यांची ठाकरेंवर खोचक टीका
09-Sep-2024
Total Views |
मुंबई : दोन हाणा पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणा, असा आपला घोषा सुरु आहे, अशी खोचक टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. सामनातील अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर करण्यात आलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "मातोश्रीपुरते साम्राज्य उरलेले उद्धटपंत मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग बांधून बसले आहेत. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, असं एकच टुमणं त्यांनी आणि रडतरौतानी 'महाभकास बिघाडी' पुढं लावलं आहे. अर्थात, त्यांच्या मनामध्ये बिघाडीतील तिन्ही पक्ष मिळून उद्धटपंतांचे नाव जाहीर करतील. पण, पटवलेले नाना आणि बारामतीचे काका त्यांच्या वक्तव्याची दखल सुद्धा घेत नाहीत," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "पाच वर्षांपूर्वी युतीने निवडणूक जिंकली, त्यावेळी चर्चेसाठी भाजपाचे नेते मातोश्री वर जाऊन त्यांना प्रचंड आदर देत होते, हे आठवतं का? पण, आता बिघाडीनं जागा दाखवून दिली आहे. तरी यांचा आपला घोषा सुरुच आहे, दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा. दिल्लीत जाऊन तीन तीन दिवस काँग्रेस नेते भेटत नाहीत. बारामतीचे काका 'नंतर बघू' म्हणतात आणि पटवलेनी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या नावाला 'नाना' म्हणायला सुरुवात केली आहे. उद्धटपंत आणि रडतरौताला भाजपा नेत्यांसंदर्भात बोलून बोट मोडत बसण्याशिवाय आता दुसरा उद्योगच नाही," असेही त्या म्हणाल्या.