साऱ्या गावांतील दीड दिवसांच्या श्रीगणेशांची सामूहिक विसर्जन मिरवणूक

वसईत आजही परंपरा कायम

    08-Sep-2024
Total Views |
vasai city ganesh festival

 
वसई :      तालुक्यात घराघरात बसवलेल्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे सर्वत्र मोठ्या भक्ती भावाने विसर्जन करण्यात आले. यामध्ये वसईच्या ग्रामीण भागात पूर्ण गावभर पूर्ण गावांत मिरवणूक काढून साऱ्या गावांत बसवण्यात आलेल्या दीड दिवसांच्या बाप्पांचे एकत्रित श्रीगणेश विसर्जन करण्याची परंपरा आजही कायम असून गावातील आबालवृद्ध या विसर्जन मिरवणुकीत सामील होतात . यात दीड दिवस घरात बाप्पाना जेव्हा मखरामधून विसर्जनासाठी काढून नेण्यात येत होते तेव्हा बाप्पांना राहूद्या ना नेऊ नका ना म्हणून घरातील चिमुकले टाहो फोडत होते . बाप्पाना आपल्या घरातीलच एक सदस्य समजणाऱ्या घरातील सानुल्यांनी बाप्पा जाणार म्हणून बाल्यावस्थेतील भोकाड पसरवले होते.


दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा  


शहरी भागातील घरगुती दीड दिवसांचे बाप्पा आपल्या कुटुंबा समवेत विसर्जित केले गेले .यावेळी येथील एक एक गणपती विसर्जनाच्या ठिकाणी येत होते . परंतु वसई ग्रामीण परिसरात पारंपारिक पद्धतीने टाळ मृदूंगाच्या गजरात भजने गाऊन पहिल्या मानाच्या गणपती सोबत गावभर निघालेल्या मिरवणुकीत एक एक गणपती सहभागी होवून एकोप्याने सारे गाव व साऱ्या गावचे गणपती एकत्रित विसर्जन करण्यात आले . अनेक वर्षाची हि परंपरा या भागात आजही कायम असून यामुळे ज्या लोकमान्य टिळकांनी जो उद्धेश ठेवून श्री गणेशोत्सव सुरू केला होता तो आजही गाव खेड्यात एकोप्याच्या रूपाने दिसून येत आहे . यावेळी निघालेल्या मिरवणुकीत संपूर्ण गाव सामील झाल्याचे चित्र दिसत होते.
 
तालुक्यातील अनेक गावांतून गावातील पारंपरिक प्रथेनुसार संध्याकाळी ६ च्या सुमारास निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत मिरवणूक मार्गावरील घरगुती दीड दिवसांचे बाप्पा एक एक करत सामील झाले . यावेळी भजन , टाळ , मृदुंग, पारंपारिक गीते , व पारंपारिक नाच करीत या भागातील तानसा व तिच्या उप नद्यांच्या किनारी आणण्यात आले . येथे बाप्पाना पुन्हा एकदा रांगेत ठेवून एकत्रित आरती झाल्यानंतर नंतर वाहत्या नदी पात्रात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयकारा करून भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले . पोलिसांनी यावेळी चांगलाच बंदोबस्त ठेवला होता .यावेळी त्यांच्यामध्येही भक्तीभाव दिसून आला.