समाजवादी पक्षाच्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल.

08 Sep 2024 16:41:07

pal
 
 
लखनऊ : उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाचे नेते, वीरेंद्र बहादूर पाल यांच्या विरोधात, वकील महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मऊ बार असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष राहिलेल्या वीरेंद्र बहादूर पाल यांनी वर्षभर सदर महिलेचा शारिरीक छळ केला असून, घटनेचे व्हिडिओ आणि फोटोस् सुद्धा काढल्याची धक्कादयक बाब समोर आली आहे.
 
या प्रकरणी मऊ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात कलम ११५(२), ३५१(२), ३५२, १२३ आणि ६४(२)(एम) अन्वये, एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
 
मऊचे सर्कल ऑफिसर अंजनी कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने वीरेंद्र बहादूर पाल यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, आरोपी हा व्यवसायाने वकील आहे. पीडितेचा आरोप आहे की, ६ सप्टेंबर रोजी आरोपी तिच्या कक्षेत आला आणि तिच्यावर अत्याचार केला.
सदर आरोपी हा समाजवादी पक्षाचे माजी आमदार दयाराम पाल यांचा मुलगा असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0