मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनी 'फिलिप्स'कडून सर्वात मोठ्या रोषणाईद्वारे मोदकाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 'फिलिप्स' कंपनीकडून गणरायाचे स्वागत करण्यात आले असून यंदा गणेशोत्सवात नवा अंदाज समोर आणला आहे. कंपनीकडून साकारण्यात १६ फूटी रोषणाई मोदकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाMTB घरगुती ईकोफ्रेंडली गणेशा 2024: जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे!
दरम्यान, लालबाग-चिंचपोकळी परिसरातील शांताराम परब चौक येथे हा विद्युत रोषणाई असलेला मोदक स्थापन करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या लालबाग परिसरात गणेशभक्तांची रेलचेल पाहायला मिळत आहे. प्रसिध्द लालबागचा राजाच्या चरणी लीन होण्यासाठी विविध ठिकाणांहून भक्तांची गर्दी होत असते. तसेच, लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच भरघोस रक्कम भाविकांनी दान केली आहे.
लालबागच्या राजा चरणी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजेपासून भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन खुलं करण्यात आले. पहिल्या दिवसापासून भाविकांनी राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी भरभरून दान केले असून आता त्याची मोजदाद केली जात आहे.