गोदावरी एक्सप्रेसमधील गणेशोत्सवाला रेड सिग्नल; तब्बल २७ वर्षांच्या परंपरेला यंदा ब्रेक
08-Sep-2024
Total Views |
मुंबई : गणेशोत्सवात अनेकांना सुट्टी नसल्याने गणेश दर्शन घेणे शक्य होते. त्यामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांकरिता रेल्वे डब्यात गणराय बसवण्याची परंपरा सुरू करण्यात आली. गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा खंडित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
दरम्यान, मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या अडीच दशकांपासून सुरू राहिलेली पंरपरा यंदापासून थांबणार आहे. रेल्वे प्रवासी संघटना आणि गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे दरवर्षी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात होती. परंतु यंदा प्राणप्रतिष्ठापनेस रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे.
राज्यभरात गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून घराघरात गणरायाचे आगमान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे, मनमाड-नाशिककरांची गेल्या २८ वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यंदा खंडीत झाली आहे. यंदा गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गोदावरीचा राजा बसवण्यात आला नसून ही परंपरा खंडीत झाली. मनमाडमध्ये चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आपला संताप व्यक्त केला आहे.