गणेश मूर्तीच्या आगमनावेळी समाजकंटकांकडून दगडफेक, जिहाद्यांचा उन्माद

08 Sep 2024 19:52:12
 
 Ganeshotsav 2024
 
भोपाळ : गणेश मूर्तीच्या आगमनावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार घटना मध्य प्रदेशातील मोचीपुरा येथे शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्य़ेने नजीकचे पोलीस ठाणे गाठले असून समाज कंटकांविरोधात एफआयआरची मागणी केली आहे. यावेळी काही लोकांनी पोलीस ठाणे सभोवतालचा रस्ता आडवला होता.
 
पोलीस अधिकारी अभिनवकुमार बारंगे, औद्योगिक क्षेत्रातील राजेंद्र वर्मा हे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी उपस्थित लोकांशी घडलेला प्रकार लक्षात घेतला आणि चर्चा केली. उपस्थितांपैकी असलेल्यांनी सांगितले की, गणेशाच्या मूर्तीचे आगमन करत असताना काही समाजकंटाकांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक केली. तक्रार नोंदवत असताना भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यांनी कारवाईची मागणी केली होती.
 
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. त्यावेळी संतप्त नागरिकांनी बराच वेळ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करत कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणासंदर्भात रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. य़ानंतर हिंदू लोकांनी निदर्शन संपवले आणि गणेश आगमनात पुन्हा सक्रिय सहभाग नोंदवला.
 
याप्रकरणात पोलिसांनी प्रसारमाध्यमाला सांगितले की, अज्ञात व्यक्तिविरूद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. याप्रकरणाची अधिक माहिती लवकरच हाती येईल. 
 
 
Powered By Sangraha 9.0