ड्रीम व्हिलेज अंतर्गत १ हजार गावांचा विकास

पहिल्या टप्प्यात ३०० गावांचा विकास

    06-Sep-2024
Total Views |
 
Dream village
 
 
मुंबई, दि.५ : प्रतिनिधी : राज्यातील एक हजार गावांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि 'स्वदेस फाऊंडेशन' यांच्यात करार करण्यात आला आहे. "ही गावे शाश्वत विकासाचे अनुकरणीय मॉडेल ठरतील," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
'ड्रीम व्हिलेज' हा उपक्रम ग्रामीण समुदायांना सशक्तीकरणात महत्त्वाची भूमिका बजावेल. ही गावं योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून जगासाठी खुले केली जातील. पर्यावरण आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक राहून न्याय्य आणि शाश्वत विकासाकडे या गावांची वाटचाल होईल. शहरी भागातील कुटुंबांचे त्यांच्या गावात स्थलांतर करण्याचा एक अनोखा कार्यक्रम देखील या प्रकल्पाचा एक भाग आहे. इतरांसाठी शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करणे हा यामागचा उद्देश आहे.
 
"महाराष्ट्र सरकार आणि 'स्वदेस फाऊंडेशन' यांच्यात करार पत्रावर स्वाक्षरी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत साक्ष देताना खूप आनंद झाला! या करारामुळे पुढील ५ वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात १,००० 'ड्रीम व्हिलेज' विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या, 'स्वदेस फाउंडेशन' नाशिक आणि रायगडमधील ११ ब्लॉक्समध्ये काम करत आहे आणि मार्च २०२५ पर्यंत ३०० गावांना 'ड्रीम व्हिलेज' म्हणून रूपांतरित करेल. ही गावे शाश्वत विकासाचे अनुकरणीय मॉडेल आहेत. 'स्वदेस' च्या संस्थापक संचालक झरीना स्क्रूवाला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी एलओआयवर स्वाक्षरी केली," अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.