नवी दिल्ली : दुष्काळात होरपळणा-या नामिबियाला अनंत अंबानी यांच्या वनतारा संस्थेकडून मदतीचा हात पुढे केली जाणार आहे. "वनतारा" ही गुजरात मधील प्राण्यांच्या संवर्धनासाठी उभी राहीलेली संस्था असून, आतापर्यंत अनेक प्रजातींना
यामुळे जीवदान लाभलं आहे.
वनतारा या संस्थेचा भाग असलेले ग्रीन प्राणीशास्त्रीय बचाव आणि पुर्नवसन केंद्र, राधा कृष्ण मंदीर हत्ती कल्याण केंद्र यांच्या संयोगाने अनेक प्रजातींच्या लोकसंख्येत होणारी घट कमी करण्यात यश आलं आहे.
नामिबियातील अधिकाऱ्यांशी दुष्काळाबाबत पत्रव्यवहार करत, वनतारा संस्थेने चिंता व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार परीस्थिती इतकी भीषण आहे, की संसाधानांवर ताण येऊ नये म्हणून ; प्राण्यांच्या हत्येचा सुद्धा विचार केला जातो आहे. मात्र, वनताराने या ऐवजी वेगळा पर्याय सुचवली आहे.
नामिबियासोबत केलेल्या पत्रव्यवहारामदध्ये संस्था नमूद करते -" प्राण्यांच्या संवर्धानासाठी व रक्षणासाठी, तसेच येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी वनतारा कटीबद्ध आहे." प्राण्यांची हत्या केली जाऊ नये, यासाठी वनताराने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेच्या वतीने प्राण्यांची तात्पुरती देखभाल केली जाऊ शकते, किंवा पीडित प्राण्यांची कायमस्वरूपी, काळजी घेण्याची सुद्धा तयारी दाखवली आहे.
वनतारा संस्थेने या पूर्वी देखील अनेक प्राण्यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढलं आहे, आणि आता नामिबिया सरकारच्या संयोगाने देशातील मूल्यवान वन्यजीवांना अभयारण्य मिळणार आहे.
"नामिबिया सरकारने आपला मूल्यवान वेळ आम्हाला देऊन, आमच्या गटाने तयार केलेला प्रस्ताव विचारात घ्यावा" अशी विनंती पत्राद्वारे केली गेली आहे.
नामिबिया समोर असलेलं आव्हान लक्षात घेता, वनताराने सुचवलेला पर्याय हिताचा ठरू शकतो.