चेन्नई : सणासुदीच्या हंगामात ट्रक भाड्यात वाढ झाली असून ऑगस्टपर्यंत वाढीचा कल कायम ठेवला आहे. श्रीराम मोबिलिटी बुलेटिन नुसार सलग दुसऱ्या महिन्यात वाढला. सणासुदीच्या हंगामाचा दृष्टिकोन व निवडणुकीनंतरच्या वाढलेल्या सक्रियतेसह विविध वाहतूक मार्गांवर मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार पुन्हा सुरू केल्याने विशेषत: कोलकाता-गुवाहाटी-कोलकाता मार्गावरील ट्रक भाड्यात वाढ झाली आहे. मागील ४० टक्क्यांपेक्षा आता जवळपास ६० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. विशेषत: कोलकाता-गुवाहाटी-कोलकाता मार्गावरील ट्रक भाड्यात वाढ झाली असून सर्वाधिक ३.० टक्के इतकी वाढ झाली आहे.
दिल्ली-कोलकाता-दिल्ली आणि दिल्ली-हैदराबाद-दिल्ली मार्ग देखील अनुक्रमे २.७ टक्के आणि २.३ टक्के वाढले आहेत. सफरचंद कापणी आणि मतदानाशी संबंधित सक्रियतेमुळे श्रीनगर प्रदेशात मालवाहतुकीचे दर वाढले. या भागात ऑगस्टमध्ये मालवाहतुकीचे दर जवळपास १० टक्क्यांनी वाढले. वायनाड प्रदेशात ट्रकची संख्या कमी झाल्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली असून त्यापैकी बरेच पुनर्वसन कार्यात गुंतलेले आहेत.
श्रीराम फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ वाय.एस. चक्रवर्ती यांनी सांगितले की, "जसा सणासुदीचा हंगाम जवळ येत आहे तसतसे भारतातील कंपन्या उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे प्रमुख मार्गांवर ट्रक भाड्यात वाढ होत असून विशेषतः सफरचंद पिकिंग सीझन आणि निवडणूकपूर्व स्थितीमुळे श्रीनगर क्षेत्र सक्रिय आहे.