मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाची जय्यत सुरू असून मुंबईतील लालबाग परिसरात गणेशभक्तांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींची वर्णी लागली आहे. अनंत अंबानी यांना मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन -
दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी अंबानी कुटुंबीयांकडून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकरिता धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान दिले जात असते. त्यांच्या या योगदानाची दखल मंडळाकडून घेण्यात आली आहे.
अंबानींकडून दरवर्षी लालबागच्या राजाला कोट्यवधींचे दान
लालबाग राजाच्या चरणी अंबानी कुटुंबियांकडून कोट्यवधींचे दान देण्यात येते. विशेष म्हणजे मागील वर्षी स्वतः अनंत अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दान केला होता. त्यानंतर आता लग्नानंतर अनंत अंबानी यांनी यंदाही लालबागच्या राजाला मोठी देणगी दिल्याचे बोलले जात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सव काळात मिळालेल्या दानातून मंडळामार्फत आजारी, गरजू व्यक्तींना मोठ्या प्रमाणात समाजकार्य देखील केली जाते.