मुंबई : भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या माध्यमातून 'लॉयर्स कॉन्फरन्स २०२४' या कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र व गोवा येथून १५ वरिष्ठ वकिलांची पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. या कार्यक्रमात मुंबईतील वकील जयप्रकाश पवहारी मिश्रा यांचा 'वरिष्ठ वकील' म्हणून सत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान, वकील जयप्रकाश मिश्रा यांचा सन्मान ही आपल्याकरीता अभिमानाची गोष्ट आहे. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाची त्वरित दखल घेऊन माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली येथे सत्कार समारंभाचे आयोजन मेमा पार्टी हॉल, बोरिवली (पश्चिम) येथे सायंकाळी ६.३० वाजता केले. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून माजी राज्यपाल राम नाईक, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषाताई चौधरी यांनी विशेष उपस्थिती लावली.
सन्मानित वकील जयप्रकाश पवहारी मिश्रा यांच्याप्रती असलेल्या भावनेचे व निष्ठेचे द्योतकच आहे. जयप्रकाश पवहारी मिश्रा यांच्या ४८ वर्षे अविरत करीत असलेल्या मेहनतीचा अभिमान असल्याचा उल्लेख केला, माजी राज्यपाल राम नाईक यावेळी म्हणाले. आजवर सोबत असलेल्या, नसलेल्या सर्वांचे आभार मानताना हा पुरस्कार त्यांच्यावर झालेल्या संघसंस्कारांचा आहे. हा पुरस्कार मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अर्पण करीत आहे, असेही मिश्रा यांनी सांगितले.