गणेशोत्सवाकरिता पुणे पोलीस प्रशासन सज्ज, चोख बंदोबस्त तैनात

    05-Sep-2024
Total Views |
ganesh festival pune police administration


मुंबई :       गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे शहरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली आहे. तसेच, या भेटीदरम्यान येथील बंदोबस्ताची पाहणी केली असून त्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शनदेखील केले आहे. त्याचबरोबर, गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.


दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन -
दरम्यान, पुणे शहरात गणपती प्रतिष्ठापना व मूर्ती खरेदीनिमित्त वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची साहित्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून व रस्त्यांवरून धावणा-या जड / अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होऊन त्यांच्या जीवितास धोका पोहोचवू नये याकरिता वाहतूक पोलीस प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.


हे वाचलंत का? -    गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा


शहर वाहतूक पोलीस विभागाकडून मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी). ११६ (४) आणि ११७ अन्वये अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेशदेखावे वाहतूक करणारी वाहने इ.) वगळता ०५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर गणपती विसर्जनापर्यंत खालील मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूकीस २४ तास बंदी घालण्यात आली आहे.


पुणे शहरातील गणेश मूर्ती खरेदीसाठी येणारे भक्त/मंडळासाठी पार्किंग व्यवस्था :-

१. न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा या दरम्यान रस्त्याचे कोर्टाकडील एका बाजूस
२. वीर संताजी घोरपडे पथावर म.न.पा. बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याचे दक्षिण बाजूस
३. टिळक पुल ते भिडे पुल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर
४. मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळावर
५. शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभुषण चौक :- फक्त रस्त्याचे डावे बाजुस