नवी दिल्ली : आसाममधील वाढत्या किडनीच्या आजारांमागे मियां समुदाय आहेत का, त्यांच्याकडून मासे खरेदी करू नका, ते युरिया वापरत आहेत, असा इशारा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिला आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी यासंदर्भात 'एक्स'वर पोस्ट केली असून आसाममधील काही लोक जाणूनबुजून युरियाने भरलेले मासे जनतेला वितरित करत आहेत. जनतेने सतर्क राहावे, सरकारही कारवाई करत आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, युरियायुक्त मासे खरेदी करू नका जे व्यवसाय वाढवण्यासाठी शॉर्टकट घेत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्थानिक जनतेला आवाहन केले आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी मत्स्यशेतीत युरिया वापरणाऱ्या नागाव आणि मोरीगाव येथील मत्स्य उद्योग करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नागाव आणि मोरीगाव येथील मासेमारी उद्योगात स्थलांतरित (मियां समुदाय) वर्चस्व असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले की, अशा लोकांकडून मासे घेणे धोकादायक ठरू शकते. गेल्या चार वर्षांत नागाव आणि मोरीगावमध्ये मत्स्यपालन करणाऱ्या लोकांमुळे राज्यात किडनीचे आजार वाढत आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील उत्पादक मत्स्यपालनासाठी युरियाचा वापर करतात. नागाव आणि मोरीगाव येथील मासेमारी उद्योगात स्थलांतरित (मियां समुदाय) वर्चस्व असल्याचेही त्यांनी सांगितले.
आसाममधील काही लोक जाणूनबुजून युरियाने भरलेले मासे जनतेला वितरित करत आहेत. जनतेने सतर्क राहावे, सरकारही कारवाई करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले, तसेच, मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी शॉर्टकट घेतात अशा लोकांकडून मासे खरेदी करू नका असे सांगताना मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय मार्ग आहेत. मत्स्योत्पादनासाठी शॉर्टकटचा अवलंब करणे चालणार नाही, असे मुख्यमंत्री सरमा यांनी यावेळी स्पष्ट केले.