धक्कादायक! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ७० वर्षीय कट्टरपंथी अन्वरकडून हिंदू मुलीचे लैंगिक शोषण

05 Sep 2024 16:23:12
 
Minor Girls Sexual Assualt
 
लखनऊ : कट्टरपंथी अन्वर खान याने एका १० वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीसोबत अश्लील कृत्य केले. पोलिसांनी आरोपी अन्वरला आपल्या ताब्यात घेतले असून वास्तविक पाहता पीडित महिला अन्वरच्या दुकानात दैनंदिन जीवनावश्यकतेच्या वस्तू आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी अन्वरने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आत ओढले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात घडली.
 
ही घटना सीतापूर जिल्ह्यातील हरगाव पोलीस ठाणे हद्दीतील आहे. हिंदू मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावेळी पीडितेने सांगितले की, ती ३ सप्टेंबर मंगळारी संध्याकाळी ६ वाजता अन्वरच्या दुकानात सामान घेत होती. यावेळी मुलीला चॉकलेट देऊन मुलीला दुकानात ओढले गेले.
 
 
 
अन्वर खानने मुलींवर अनेकदा आत जाण्यासाठी दबाव टाकला. मुलगी राजी न झाल्याने अन्वरने तिला जबरदस्तीने आत नेले. तेथे त्याने मुलीचा विनयभंग सुरू केला. यामुळे घाबरलेल्या मुलीने जोरजोरात आरडा ओरड केला. मुलीने सांगितले ती, तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमलेले पाहून अन्वरने पीडितेला सोडले.
 
मुलीने घरी जात घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या काकांनी सांगितले की, जेव्हा त्यांची मुलगी रडत घरी आली तेव्हा त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अन्वरला अटक केली आहे. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
सीतापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणाले की, अन्वर खानवर भारतीय न्याय संहिता च्या कलम ७४ अंतर्गत पोक्सो कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे. अन्वर खानच्या विरोधात जलदगतीने न्यायालयात खटला चालवून आरोपीला लवकरात शिक्षा करावी. याप्रकरणाचा पोलिसांनी इतर तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर कारवाईची सुनावणी केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0