जागावाटपाआधीच उबाठा गटाची मुंबईतील संभाव्य यादी पुढे! कोण कुठे लढणार?
05-Sep-2024
Total Views |
मुंबई : विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी पुढे आली आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. मात्र, आता उबाठा गटाची यादी पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
मुंबईत विधासभेच्या ३६ जागा आहेत. यातील २० ते २२ जागांवर उबाठा गटाने दावा केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पुढे आली होती. तसेच शरद पवार गटानेही मुंबई शहर आणि उपनगरातील मिळून ७ जागा लढवण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता उबाठा गटाची मुंबईतील २२ उमेदवारांची संभाव्य यादी पुढे आली आहे.