‘बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी,’ ही कविता उपरोधी स्वरात ऐकवून त्यांनी भर पत्रकार परिषदेत घटक पक्षांना डिवचले. त्यावेळी काँग्रेस आणि शरद पवारांनी हा विषय हसण्यावारीवर नेला असला, तरी त्यांच्या हसण्यातला बेरकीपणा ठाकरेंना कळला नाही. मूळ काँग्रेसी असलेले पवार अशा बाबींवर उघडपणे बोलत नाहीत. डुख धरून राहतात आणि अचूक वेळ साधत ‘गेम’ करतात. गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींवरून त्याचा अंदाज आला असेलच.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात उद्धव ठाकरेंनी म्हणे ‘मातोश्री’च्या अंगणात पारिजाताचे झाड लावले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान तो बहरलाही, पण पारिजातकाची फुले शेजारच्यांच्या दारात पडली. हा आमचा दावा नाही, तर खुद्द उद्धवरावांच्या मुखातील हे बोल. यंदा लोकसभा निवडणुकीत मविआला अनपेक्षित यश मिळाले असले, तरी उद्धव ठाकरेंचा ‘स्ट्राईक रेट’ सर्वात खालावलेला. त्यावर आत्मचिंतन करायचे सोडून ते लागले फुकाच्या बाता मारायला. ‘बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी,’ ही कविता उपरोधी स्वरात ऐकवून त्यांनी भर पत्रकार परिषदेत घटक पक्षांना डिवचले. त्यावेळी काँग्रेस आणि शरद पवारांनी हा विषय हसण्यावारीवर नेला असला, तरी त्यांच्या हसण्यातला बेरकीपणा ठाकरेंना कळला नाही. मूळ काँग्रेसी असलेले पवार अशा बाबींवर उघडपणे बोलत नाहीत. डुख धरून राहतात आणि अचूक वेळ साधत ‘गेम’ करतात. गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींवरून त्याचा अंदाज आला असेलच.
मविआला मिळालेल्या लोकसभा विजयाचे श्रेय घेऊ पाहणार्या उद्धव ठाकरेंना विधानसभेआधी शरद पवारांनी काँग्रेसच्या मदतीने अक्षरशः गुडघ्यावर आणले. मुख्यमंत्रिपद राहिले दूरच, ठाकरेंच्या पक्षाला ८० जागा सोडण्यासही त्यांचा विरोध! लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव हे मविआचा चेहरा होते. संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार, उद्धवरावांच्या सभांसाठी काँग्रेससह पवार गटाकडून मागणी होती. लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी कानाकोपर्यातून स्वयंस्फूर्तीने जमा व्हायचे. असे असेल तर मग लोकसभेला ‘डिमांडेबल’ असणारे ठाकरे विधानसभेला नकोसे का वाटावे? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, संपुष्टात आलेली उपयुक्तता. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, असे जे वातावरण तयार करण्यात आले, त्याचा फुगा अल्पावधीतच फुटला. शिंदे-ठाकरेंमध्ये लोकसभेच्या १३ जागांवर थेट लढत झाली. त्यात शिंदेंनी बाजी मारली. भविष्यात हीच स्थिती कायम राहण्याचा सर्वेक्षणाचा अंदाज. त्यामुळे ठाकरे विधानसभेला तारक ठरण्याऐवजी मारक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेस आणि पवारांनी त्यांची कोंडी सुरू केली. ठाकरेंना कमीतकमी जागांवर रोखण्याचे नियोजन सुरू आहे. सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा झाडून आल्यानंतर ठाकरेंना मिळालेली ही बक्षिसी असावी. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

काटा रूते कुणाला
सांगलीच्या जागेवरून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि उबाठा गटात निर्माण झालेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. तेथील काँग्रेस कार्यकर्ते उबाठाला स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे राहुल गांधींच्या सांगली दौर्यापासून उद्धव ठाकरेंना लांबच ठेवण्यात आले. त्याउलट शरद पवारांसह जयंत पाटील यांच्यासाठी पायघड्या घालण्यात आल्या. त्यामुळे ठाकरे काँग्रेसला नकोसे झालेत का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक.
लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाने सांगलीवर परस्पर दावा करीत चंद्रहास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली. ते विजयीही झाले. या घटनेनंतर सांगलीत काँग्रेस आणि उबाठामध्ये पडलेली ठिणगी दिवसागणिक उग्र स्वरूप धारण करू लागली आहे. विश्वजित पाटील आणि विशाल पाटील यांच्या जोडगोळीने विजयानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, ‘मातोश्री’ची पायरी ओलांडली नाही. आता राहुल गांधींच्या कार्यक्रमात न बोलावून त्यांनी जणू वचपाच काढला.
सांगलीच्या वसंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यातील वाद सर्वज्ञात. पुढच्या पिढीनेही हा वादाचा वारसा कायम ठेवला, त्याची जाणीव अधूनमधून होत असते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ‘विशाल पाटील विरुद्ध जयंत पाटील’ संघर्ष दिसून आला. तरीही विशाल पाटलांचे जीवलग मित्र विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. त्यांचे नावही निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आले आहे. मात्र, उद्धव ठाकरेंना त्या पंक्तीत स्थान देण्यात आले नाही. किंबहुना त्यांना बोलावलेही नाही. या कृतीमागे कोणी एकटा माणूस नाही, तर ठरवून केलेला ‘कार्यक्रम’ आहे, हे एव्हाना ठाकरेंच्या लक्षात आले असेल.
युतीत असताना भाजपने कधी उद्धवरावांचा शब्द खाली पडू दिला नाही. फडणवीसांनी तर त्यांचे सगळे नखरे निमूटपणे सहन केले. तरीही भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप ठाकरे वारंवार करतात. आता काँग्रेस आणि शरद पवारांकडून मिळत असलेली कपटी वागणूक त्यांना सौहार्दाची वाटत असेल, तर त्यांचा सहवास उद्धवरावांना लखलाभ!
लेखक - सुहास शेलार