पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे

MPCB प्रस्तुत दै.मुंबई तरुण भारत MahaMTB इकोफ्रेंडली गणेशा २०२४ स्पर्धा

    05-Sep-2024
Total Views |

Ecofriendly ganesha
 
मुंबई : गणपती बाप्पा आले आणि संपूर्ण धरणीमाता जणू बाप्पाच्या आगमनासाठी हिरवा शालू नेसून श्रृंगाराने सजली आहे. याच प्रमाणे गौरी-गणपतीचा सण भारतीय संस्कृतीत पर्यावरणपूरक साजरा करण्याचे संस्कार आपल्याला पूर्वापार मिळाले आहेत. गणेशोत्सवासोबतच पर्यावरण रक्षण हा संदेश देण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ (महाएमटीबी) आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) २०२३ या वर्षांपासून विशेष स्पर्धेचे आयोजन करत आहेत. यंदाच्या वर्षीही 'एमपीसीबी प्रस्तुत महाएमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२४' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 'उचित मीडिया' आणि 'मेघा ट्रेडर्स' या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. तसेच टीजेएसबी बँक ही बँकिंग पार्टनर आहे.
 
गणेशभक्तांनी दि. ७ सप्टेंबर २०२४ ते १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत आपल्या लाडक्या बाप्पाचे तीन फोटो आणि अर्जासोबत दिलेली माहिती भरून पाठवावी. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रांचेही ऑनलाईन वितरण केले जाणार आहे. पर्यावरणपूरक आरास करणाऱ्या विजयी स्पर्धकांना दोन लाखांपर्यंतची बक्षिसे जिंकता येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/47f1spE या या लिंकवर क्लिक करुन अर्ज भरा.
 
गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत होणार!
 
एमपीसीबी प्रस्तुत महाएमटीबी ईकोफ्रेंडली गणेशा २०२३ स्पर्धेला गणेशभक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला. आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावे करून अनेकांनी या स्पर्धेत बक्षिसेसुद्धा जिंकली होती. यंदा या स्पर्धेतील बक्षीसांची रक्कमही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेला गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दै. मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबी तर्फे करण्यात आले आहे. तेव्हा बाप्पाची आरास झाल्यानंतर लवकरात लवकर स्पर्धेचा अर्ज भरा आणि जिंका २ लाखांपर्यंतची बक्षिसे.