उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का! भाजपची जोरदार टीका

    05-Sep-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, अशी खोचक टीका भाजपने केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे दारोदार भटकत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "पापा कहते थे, बड़ा नाम करेगा
                                         बेटा हमारा ऐसा काम करेगा
                                         मगर मैं तो ये भी ना समझू
                                         कि मेरी जगाह आखिर हैं कहाँ ???
 
सध्या दारोदार भटकणाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था अशीच झाली आहे. खुर्चीच्या मोहापायी भाजपाचा हात सोडून असंगाशी संग केला आणि मग आता त्यांनी यांची ना घर का ना घाट का अशी अवस्था करून सोडली. ज्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी जनतेचा कौल नाकारला त्याच मुख्यमंत्रीपदासाठी आज यांच्यावर दारोदार भटकायची वेळ आली आहे," असे ते म्हणाले.
 
 हे वाचलंत का? - अखेर शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या ताब्यात!
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी काय नाही केलं लाचारीसाठी? दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही असे सांगणाऱ्यांना आज सारख्या दिल्लीच्या वाऱ्या करून मॅडमसमोर झुकायचे दिवस आले. सिल्व्हर ओक, १० जनपथ च्या पायऱ्या झिजवल्या. मात्र सगळीकडे निराशाच. शरद पवारांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद नाही, काँग्रेसने सांगितलं की, निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर चर्चा नाही, यांच्या सोनिया मॅडमने तर साधी भेटसुद्धा दिली नाही."
 
 
 
"हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा फक्त आडनाव लावल्याने येत नाही तर कर्तृत्वही तसेच ठेवावे लागते. आज हे असे दारोदार भटकत वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला, विचारांना काळिमा फासू नका," असेही केशव उपाध्ये ठाकरेंना म्हणाले आहेत.