उदयपूर : कन्हैयालाल हत्याकांडातील (Kanhaiya Lal Murder) आरोपी मोहम्मद जावेदची जामीनावर सुटका करण्याचे आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती प्रवीण भटनागर यांच्या खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारताना हा आदेश देण्यात आला आहे. ही घटना उदयपूर येथील असून ५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याप्रकरणात प्रसारमाध्यमाने सांगितले की, राजस्थान उच्च न्यायालयाने पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती प्रवीण भंडारी यांनी जावेदला जामीन देण्याचे आदेश दिले. यासदंर्भात जावेदने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जावेदने याचिकेत म्हटले आहे की, आपल्याविरूद्ध खटल्यात कोणतेही ठोस पुरावे हाती आले नाहीत.
जावेदने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्याविरोधात कोणताही एक पुरावा नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळाला. त्यांच्या आवाहनालाही विरोध करण्यात आला. सरकारी न्यायालयीन वकिलांनी याप्रकरणात सांगितले की, तो मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांमध्ये सामील असून त्याला जामीन मिळू नये. सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांनी जो युक्तीवाद केला. त्या युक्तीवादास ग्राह्य धरले गेले नाही. मात्र जावेदला जामीन देण्याचे आदेश देण्यात आला.
दरम्यान, उदयपूर येथे टेलरिंगचे काम करणाऱ्या कन्हैया लालची हत्या मोहम्मद आणि रियाझने केली होती. याप्रकरणाचा तपास एनआयएनकडे सोपवण्यात आला आहे. कन्हैया लालच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपीशिवाय त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
कन्हैया लालच्या हत्येच्या कटात १९ वर्षीय जावेदचाही यात समावेश असल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे. दरम्यान, जावेद हा कन्हैया लालच्या दुकानाच्या आसपासच्या परिसरात काम करायचा. यावेळी त्याने कन्हैया लालच्या हालचालीवर लक्ष ठेवत. यावेळी कन्हैया कुठे जाते? तो कधी पुन्हा दुकानावर येतो. याकडे त्यचे लक्ष होते.
याप्रकरणाची सुनावणी अद्यापही झाली नाही. या प्रकरणाचा कट रचणाऱ्यांना आणि मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. या कारणामुळे कन्हैया लालचे कुटुंब निराश झाले. कन्हैया लालचा मोठा मुलगा यश साहू याने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोवर त्यांचे अस्थि कलश विसर्जन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.