ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला नितेश राणेंचे महत्त्वाचे आवाहन!
05-Sep-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Varah Jayanti) भाद्रपद शुक्लपक्षातील तृतीयेला म्हणजेत शुक्रवार, दि. ०६ सप्टेंबर रोजी वराह जयंती अनेक ठिकाणी साजरी केली जाते. हिंदू धर्मात वराह जयंतीला एक विशेष महत्त्वं असून भाजप आमदार नितेश राणे यांनी समस्त हिंदू बांधवांना मोठ्याप्रमाणात वराह जयंती साजरी करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी वराह हा त्यांचा तिसरा अवतार. ज्याप्रमाणे अन्य हिंदूसण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो, प्रत्येक जयंतीला कुटुंबासह हिंदूंची एकजूट दाखवतो, त्याचपद्धतीने ६ सप्टेंबर रोजी वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाज म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी वराह जयंती साजरी करायची असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.