सॅमसंग-वोडाफोनची हातमिळवणी; भारताचा चीनला मोठा दणका!
सॅमसंग आणि वोडाफोनने केलेल्या डीलमुळे, चीनचे नुकसान होणार असून, वोडाफोनचे चार प्रमुख नेटवर्क गियर बदलले जाणार आहेत.
04-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : स्मार्टफोन विक्रेती कंपनी सॅमसंगने भारतामध्ये स्वःताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ स्मार्टफोनच नव्हे, तर त्यांच्या रोजच्या जीवनात वापरली जाणाऱ्या अनेक उपकरणांची सुद्धा भारतात चलती आहे. परंतु, सॅमसंग कंपनी आता वोडाफोन आयडिया या सोबत करत असलेल्या करारामुळे चर्चेत आली आहे. या करारामुळे चीनला मोठा फटका बसणार आहे.या करारामुळे देशातील ४ प्रमुख फोर-जी नेटवर्क गियर बदलले जाणार आहेत. भारताच्या टेलिकोम बाजारात सॅमसंगला, नोकीया आणि एरीक्सन सारख्या कंपन्यांचे आव्हान असल्याचे दिसून आले आहे. परंतु साउथ कोरीयन कंपनीने या करारानंतर स्वःताचे वर्चस्व कायम राखले आहे.
या करारानंतर सॅमसंगला, व्ही-आय साठी टेलीकॉम इक्विप्मेंटचे कंत्राट मिळू शकते. वोडाफोन कडून पंजाब, बिहार, ओडीसा आणि कर्नाटक या वर्तुळात टेलीकोम इक्विप्मेंट उभारले जाऊ शकतात. या मध्ये लॉजिस्टिक आणि लेबर कोस्ट सुद्धा समाविष्ट आहे. काही माध्यम संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांमध्ये काही आर्थिक वाटाघाटी सुरू असून लवकरच करार पूर्ण होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनचे या करारावर बारीक लक्ष्य होतं. सध्या वोडाफोनला नोकीया आणि एरीक्सन कडून नेटवर्क गियरचा पुरावठा केला जातो, त्यामुळे चीन साठी ही धोक्याची घंटा आहे.
BSNL ने घेतला होता असाच एक निर्णय
BSNL 5G च्या टेस्टींग नंतर, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची अशी इच्छा होती, की नेटवर्कसाठी आपण चीनवर अवलंबून राहता कामा नये, आणि आपण हे करून सुद्धा दाखवले. याच पद्धतीचा करार आता सॅमसंग आणि वी.आय. मध्ये झाल्यामुळे असं म्हणता येईल की भारताचा विजय झाला असून चीनला याचा कुठलाही फायदा होणीर नाही. या करारातील सकारात्मक गोष्ट म्हणजे यात चीन ने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही.