गोहत्या करण्यासाठी आलेल्या कट्टरपंथींनी पोलिसांवर केला गोळीबार

    04-Sep-2024
Total Views |

cow slaughter
 
लखनऊ : कट्टरपंथी तरूणांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात घडली. महफूज आणि महमूद नावाच्या दोन सख्ख्य़ा भावांनी केलेल्या गोळीबारातून पोलीस थोडक्यात बचावले, मात्र, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आरोपींवर गोळीबार केला असून दोन्ही भाऊ जखमी झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक जिंवत गाय, पिस्तुल, गोळ्या आणि धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली आहे.
 
फतेहपूर जिल्ह्य़ातील सुलतानपूर घोष पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. पोलीस ठाण्याचे अधिक्षक राजेंद्र कुमार त्रिपाठी यांनी मंगळवारी त्यांच्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्याने लिहिले की, ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या संबंधित पथकांसह गस्त घालण्याचे काम करत होते. दरम्यान, एका सूत्राने गोहत्या करण्यासाठी काहीजण येत आहेत अशी माहिती दिली.
 
 
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, घटनास्थळी गायीचे वासरू एका झाडाला बांधलेले दिसले होते. आरोपीं गायीच्या वासराची हत्या करण्याच्या तय़ारीत होते. पोलिसांना पाहाताच दोन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळ्या झाडायला सुरूवात केली त्यावेळी ती गोळी एका पोलिस कमिश्नरच्या पायात लागली. आणि ते थोडक्यात बचावले गेले. प्रत्युत्तरादाखल पोलीस ठाण्यातील अधीक्षकांनी गोळीबार केला.
 
याप्रकरणात पोलीस अधीक्षक आणि आरोपी दोन्ही जखमी झाले असून गोळ्या त्याच्या पायाला लागल्या. ४४ वर्षीय महफूज आणि ४२ वर्षीय महमूद अशी जखमींची नावे आहेत दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि फतेहपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. तपासादरम्यान दोघांक़डून पिस्तुल, काडतुसे आणि गायीच्या तस्करीसाठी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून सापडलेली दुचाकीही ताब्यात घेतली आहे.