वंचित पीडितेच्या घरात घुसून जातीवाचक वक्तव्य करत केला विनयभंग, इस्लाम आणि निजामुद्दीनचे हैवानी कृत्य

    04-Sep-2024
Total Views |

Women Sexual Harassement
 
लखनऊ : कट्टरपंथींनी वंचित महिलेचे लैंगिक शोषण (Women Sexual Harassement) केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात घडली आहे. पीडितेचे कपडे फाडून पीडितेवर विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर त्यांना पीडितेला जातीवाचक वक्तव्य करत हिनवण्यात आल्याची माहिती या घटनेतून उघडकीस आली आहे. ही घटना १८ ऑगस्ट रोजी घडली असून घटनेतील आरोपी इस्लाम, निजामुद्दीन, कयाम खान आणि मुज्जीम आहेत. मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी याप्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास आणि इतर कारवाई केली गेली आहे.
 
वकील राम वाचन वर्मा यांनी मंगळवारी ३ सप्टेंबर २०२४ रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या X ट्विटर हँडेलवर संबंधित प्रकरणाची माहिती शेअर केली आहे. याप्रकरणाच्या तक्रारीनुसार, गोंडा जिल्ह्यातील कौडिया पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. येथील एका गावात राहणाऱ्या वंचित समुदयाच्या पीडित महिलेने २३ ऑगस्ट रोजी गोंडा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार पत्र लिहिले आहे.
 
तक्रारीत पीडितेसोबत घडलेला प्रकार नमूद केला. गावात भाडेतत्वावर घेतलेल्या जमीनीवर घर बांधले होते. यावेळी १८ ऑगस्ट रोजी पीडितेचा पती बाहेर कामानिमित्त गेला असून पीडित महिला घरात एकटीच होती. इस्लाम, नजामुद्दीन, कयान खान आणि मुज्जीम हे रात्री ९ वाजताच्या सुमारास, पीडितेच्या घरात घुसल्याचा पीडितेने आरोप केला आहे. या सर्वांनी पीडितेचे लैंगिक शोषण केले. पीडितेने आरोपींच्या कृतीविरोधात प्रतिकार केला असता तिचे कपडे फाडून तिला बेदण मारहाण करण्यात आली होती.
 
 
 
यावेळी तक्रारीनुसार सांगण्यात आले की, आरोपी म्हणाला, "अरे बदमाश तु माझं काहीही एक वाक़डे करू शकणार नाहीस", पीडितेला मारहाण होत असल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी पाहिले असता ती लोकं घाबरली होती. त्यावेळी संबंधित आरोपी घटनास्थळावरून निघून गेले होते. त्यावेळी पळून जाताना संबंधित कट्टरपंथी आरोपींनी पीडितेला पोलिसात तक्रार करू नकोस अशी धमकी दिली होती. याप्रकरणाची ३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दखल घेतली असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.