बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढणार

    04-Sep-2024
Total Views |
 
Vinesh Phogat-Bajrang Punia
 
नवी दिल्ली : बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat-Bajrang Punia) हे विधानसभा निवडणूर लढवणार आहेत. विनेश फोगाट हरियाणातील जलाना आणि बजरंग पुनिया पंजाबमधील बादली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार आहे. बुधवारी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली होती. २०२३ या वर्षात भाजप नेते भृजभूषण यादव यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होते. त्यावेळी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी  बृजभूषणविरोधात दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी या आंदोलाना पाठिंबा गिवा दिला होता.
 
गेल्या काही दिवसांपासून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची संघी दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ४ सप्टेंबर रोजी राहुल गांधींच्या भेटीनंतर बजरंग पुनियाला बादली विधानसभा निवडणुकीतून उमेदवार दिली जाणार आहे. तर विनेश फोगाटला हरियाणातील जलाना येथून तिकीट दिले जाणार आहे.
 
विनेश फोगाटला संबंधित मतदारसंघातून तिकीट देण्याचे कारण सांगितले आहे. त्याठिकाणी विनेश फोगाटचे सासर आहे. याचा मतदारनावर विनेश फोगाटला मत मिळण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. कुलदीप वत्स हे बदली मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांची गणना हरियाणातील बड्या ब्राह्मण नेत्यांमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत बदलीच्या जागेवर तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेसला ही जागा सोडावी लागणार आहे.
 
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे केंद्र सरकारविरोधात नेहमीच बोलत असतात. दोघेही ब्रिजभूषण य़ांच्याविरोधात आंदोलन करत होते. यावेळी याआंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. नुकतीच ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटचे वाढत्या वजनाने अंतिम सामना खेळता आला नाही. त्यावेळी काँग्रेस नेते हे विनेश फोगाटच्या बाजून केंद्र सरकारला दोष देत होते.