मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Samvad Baithak) विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांतच्या वतीने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता राजा शिवाजी विद्यालय संकुल सभागृह, हिंदू कॉलनी, दादर पूर्व येथे सदर बैठक संपन्न होईल.
हे वाचलंत का? : दिवंगत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेत फूट
यावेळी विहिंप कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर 'हिंदुत्वासमोरील आव्हाने आणि गणेशोत्सवांची भूमिका' याबाबत उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. लव जिहाद, लँड जिहाद आदीसोबत फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून हिंदू समाजात भय आणि संभ्रमाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न देश विदेशातील शक्ती करीत आहेत. अशा स्थितीत लोकमान्यांच्या मनातील 'स्व' चे रक्षण आणि जागरण करण्यासाठी विहिंपने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे.