दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्याची सरकारची भूमिका
04-Sep-2024
Total Views |
( Image Source : MAHARASHTRA DGIPR )
मुंबई : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी स्पष्ट केले.
मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या बैठकीवेळी विखे पाटील बोलत होते. या बैठकीला समितीचे अध्यक्ष उमाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव सुनील कोठेकर, अजित देशमुख, धनंजय निकम यांसह विविध मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, जमीन महसुलाच्या अनुषंगाने राज्यातील कायदे जुने झाले आहेत. त्यांमध्ये काल सुसंगत बदल व सुधारणा होण्याची गरज आहे. हे वेळोवेळी दिसून आले आहे. तसेच महसूल कायदा सुधारणा होण्याची आवश्यकता न्यायालयांनी देखील सुचविली होती. या अहवालाचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अवलोकन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.